40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ टाकरी येथे जागतिक योग दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार

टाकरी येथे जागतिक योग दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार

0
39

blank

आमगाव,दि.२२ : तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर गांगला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकरीच्या संयुक्तवतीने २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.योगशिक्षक नरेंद्र आर्य यांनी योगासनाचे विविध आसनांचे प्रात्याक्षिक सादर करून उपस्थितांना योगाचे धडे दिले.यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या ज्या विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास केले अशा १५ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला योग शिक्षक नरेंद्र आर्य,टाकरी सरपंच श्रीमती पटले,वैद्यकीय अधिकारी डाॅ.भुमेश्वर पटले,समुदाय आरोग्य अधिकारी कु.तेजस्विनी येडे,मुख्याध्यापक श्री.नेताम,योग शिक्षिका मुनेश्वरी राऊत,ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी,आशासेविका,अंगणवाडी सेविका व शिक्षक उपस्थित होते.