43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात ठिकठिकाणी महिला दिन कार्यक्रम उत्साहात

जिल्ह्यात ठिकठिकाणी महिला दिन कार्यक्रम उत्साहात

0
46

blank

गोंदिया,दि.08ः- गोरेगाव तालुक्यातील कटंगी बु.ग्रामपंचायत कार्यालयात आज 8 मार्च 2021 ला जागतिक महिला दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष  भूमेश्वरी रहांगडाले अंगणवाडी सेविका होत्या.तर  चंद्रकलाबाई नेवारे ध्वजारोहक ग्रामपंचायत सदस्य,  ममीता दिहारे प्रमुख उपस्थितीत पार पडले.या कार्यक्रमाला सरपंच तेजेंद्र हरिणखेडे,भीमराज टेंभुर्णीकर उपसरपंच,बेनीराम चौरागडे सदस्य,भूमेश्वरा मौजे सदस्या,  उर्मिला हरिणखेडे सदस्य,भुवनेश्वरी हरिणखेडे अंगणवाडी सेविका,इंदिराबाई टेंभुर्णीकर,अंजनाबाई ठाकरे अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका तसेच महिला बचत गट, सीआरपी अध्यक्ष, सचिव, लेखापाल व सर्व महिला सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

सत्कार सावित्रीच्या लेकिचा शिक्षक समितीचा अभिनव उपक्रमblank

सडक अर्जुनी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जागतिक महिलादिनाच्या पर्वावर  जिल्ह्यात कार्यरत जिल्हा परिषद महिला शिक्षिकांचा त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून शिक्षक समितीच्यावतीने तालुकानिहाय प्रत्येक शाळेत जाऊन कार्याचा गौरव करण्यात आला.सडक अर्जुनी तालुक्याती समितीचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरवार , सचिव संदीप मेश्राम, डी एच चौधरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

blank

महिला पंतजली योग तालुका समिती च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
अर्जुनी-मोर संतोष रोकडे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम बहुउद्देशिय हायस्कूल येथे ‘श्री राजश्री शाहू महाराज सभागृह’ येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटक दादा फुंडे , अध्यक्षा कांताताई पाऊलझगडे, प्रमुख पाहुणे गोविंदराव ब्राम्हणकर, राहुल ब्राम्हणकर,गिताताई ब्राम्हणकर,रोहिणी कुंभारे,प्रेमलता ब्राम्हणकर,प्रतिभा फुंडे, सौ.लिनाताई ब्राम्हणकर,.संगीता तोदले उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणाले कि,स्त्री एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण जगाची जननी आहे मग तिला सुदृढ राहण्यासाठी योगाची कास धरावीच लागेल. प्रमुख पाहुण्यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना ब्राम्हणकर तर आभार प्रदर्शन यमु ब्राम्हणकर,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  उर्मिला चुटे व कु ॠतुजा ब्राम्हणकर तसेच महिला पंतजली समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

जि. प. वरिष्ठ प्राथ.शाळा, मोरगाव येथे जागतिक महिला दिन संपन्न
कोमल है, कमजोर नही
शक्ती का नाम , नारी है
जग को , जीवन देनेवाली
मौत भी , तुम से हारी है|
प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध जगाच्या पाठीवरील कामगार महिलांनी , असमानतेविरुद्ध बंड पुकारून , महिलांच्या हक्कासाठी लढा दिला व सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा केली ती रास्त आहे कारण महिला सुद्धा समाजाचा अविभाज्य अंग असून, त्यांना सन्मान मिळायलाच पाहिजे असे मनोगत उच्च श्रेणी मुख्या. रेखा गोंडाणे यांनी व्यक्त केले.
प्रस्तुत प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अचला कापगते-झोळे, प्राची कागणे-ठाकूर,पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे,जे.एन.ठवकर,मोहन नाईक वामनराव घरतकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी शाळेच्या वतीने सौ .रेखा गोंडाणे, प्राची कागणे-ठाकूर, अचला कापगते-झोडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सु.मो.भैसारे यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमी व महिलांचे समाजातील स्थान यावर प्रकाश टाकला . मानव समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी महिलांचे महत्व अनन्य साधारण असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन नाईक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगमा शहारे,, मुक्ताई लोदी, मनीषा चाचेरे, हिना जनबंधु, पूनम नेवारे, राकेश नवरंग आदींनी सहकार्य केले.

blank