शहराच्या भुमिगत विद्युत प्रकल्पासाठी १४२.७५ कोटीच्या प्रस्तावाला मंजूरी

0
63

खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित
गोंदिया : पुर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातील भुमिगत विद्युत प्रकल्पाचे प्रस्ताव सन २०२०-२१ या वर्षाच्या अधिवेशनात मांडण्यात आले होते. दरम्यान सदर कामास प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांनी सातत्याने राज्य शासनाची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या ऊर्जा व कामगार विभागाने गोंदिया शहराच्या १४२.७५ कोटी खर्चाच्या भुमिगत विद्युत वाहिनीच्या प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे लवकरच गोंदिया शहरातील भुमिगत विद्युत प्रकल्पाची कामे सुरू होणार आहे. हे खा.प्रफुल्ल पटेल यांच्या सतत पाठपुराव्याचे फलित असून शहराचे विकास शृंखलेत आणखी एक प्रकल्पाची भर पडली आहे. विशेष माझे या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विशेष सहकार लाभला.
गोंदिया शहरातील विद्युत वाहिन्यांचे भुमिगत विद्युत वाहिन्यांमध्ये रूपांतर करणे तसेच उपकेंद्र रोहित्राच्या संख्येत वाढ करणे, नविन उच्चदाब उपकेंद्र स्थापित करणे, नविन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे अशा आदि कामांसाठी महावितरण कंपनीने १४२.७५ कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्याचे विनंती केली होती. हे सन २०२०-२१ व सन २०२२ च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आले होते. दरम्यान गोंदियाच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाची बाब शासन विचाराधीन होती. राज्याच्या विद्युत मंत्रालयाने गोंदिया शहराच्या भुमिगत विद्युत प्रकल्पाकरीता १४२.७५ कोटीच्या खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. उल्लेखनिय असे की, यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांनी राज्य सरकारशी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणून प्रकल्पाला मंजूरी प्रदान झाली आहे.
या प्रायोजनासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २५ कोटी एवढा निधी विद्युत वितरण कंपनीला उपलब्ध करून देण्यात आली आहे.  सदर निधी खर्च करण्याचेही सुचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच गोंदिया शहरातील भुमिगत विद्युत प्रकल्पाला सुरूवात होणार आहे. खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या आश्वासनानुरूप शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या शृंखलेत एक-एक करता भर पडू लागली आहे. गोंदिया शहराच्या भुमिगत विद्युत प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शहरवासीयांनी खा.प्रफुुल पटेल यांचे आभार मानले आहे.