
दोन मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात 104 कोरोनामुक्त, तर 44 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली,दि.06:आज जिल्हयात 44 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 104 जणांनी
कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29640
पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28420 वर पोहचली. तसेच सद्या 493 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू
आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 727 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नवीन मृत्यू यामध्ये रा.मार्कंडा हेटी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, तर रा. वेलगुर ता. अहेरी जि. गडचिरोली येथील
80 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.88 टक्के, सक्रिय
रूग्णांचे प्रमाण 1.66 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.
नवीन 44 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 11, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी 00, भामरागड
तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 09, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची
तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 02, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 06, सिरोंचा
तालुक्यातील बाधितामध्ये 04 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 02 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त
झालेल्या 104 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 21, अहेरी 04, आरमोरी 05, भामरागड 09, चामोर्शी 22, धानोरा 00,
एटापल्ली 01, मुलचेरा 10, सिरोंचा 11, कोरची 02, कुरखेडा 04 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज 31 रुग्णांना डिस्चार्ज
भंडारा, दि.06- जिल्ह्यात आज 31 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 57323 झाली असून आज 34 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59198 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के आहे.आज 1075 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 34 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 94 हजार 95 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59198 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 11, मोहाडी 04, तुमसर 03, पवनी 01, लाखनी 01, साकोली 07 व लाखांदुर तालुक्यातील 07 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 57323 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59198 झाली असून 820 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1055 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.78 टक्के एवढा आहे.