
अर्जुनी-मोरगाव, दि.8 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया आणि प्रकृती नेचर फाऊंडेशन अर्जुनी-मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवेगावबांध तलाव स्वछता मोहिमेंतर्गत प्लास्टीक निर्मूलन अभियान राबविण्यात आले.
नवेगावबांध येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. यामुळे तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि प्लास्टिकजन्य कचरा परिसरात पर्यटक फेकून देतात. प्लास्टिकमुळे तलावातील पाणी दूषित होऊन जैवविविधतेसह तलावातील जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. उद्भवणारा धोका टाळण्यासाठी प्रकृती नेचर फाऊंडेशनने पुढाकार घेत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या सहकार्याने तलावात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. नवेगावबांधच्या स्वागत कक्षापासून पुढे तलावाच्या काठापर्यंत परिसरात पडलेले प्लास्टीक. जमा झालेल्या कचऱ्याची वनविभागाच्यावतीने विल्हेवाट लावण्यात आली.
या वेळी NNTR चे ACF श्रीरामानुजम, Deputy Director पुनम पाटे, आरएफओ विजय धांडे, प्रकृती नेचर फाऊंडेशनचे डॉ.गोपाल पालीवाल, प्रा.अजय राऊत, डॉ.शरद मेश्राम, डॉ.आशिष कावळे व वनविभागाचे कर्मचारी, गाईड्स यांनी सहकार्य केले.