कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्यात येऊ नये – आ. किशोर जोरगेवार

0
38
चंद्रपूर,दि.30ः- कोरोनाची दुसरी लाट ओसरताच कंत्राटी पध्दतीवर नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचा-यांना कामावरुन कमी केल्या जात आहे. मात्र संकटकाळी त्यांनी दिलेली सेवा आणि संभावीत तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता सदर कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्यात येऊ नये अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या असून सदर पत्रही त्यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली, यावेळी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. संपूर्ण राज्यासह चंद्रपूरातही कोरोनाच्या दुस-या लाटेने आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण निर्माण केला होता. यावेळी आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता कंत्राटी पध्दतीवर कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या. या काळात या कर्मचा-यांनी स्वताच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणीक प्रयत्न केले. परिणामी चंद्रपूरात कोरोनातून बरे होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामूळे सदर कर्मचा-र्यांना हळूहळू कामावरुन कमी करण्यात येत आहे. मात्र संकटकाळी रुग्णसेवा देणा-या या कर्मचा-यांना कामावरुन कमी करणे योग्य नाही. तसेच संभावित तिसरी लाट आल्यास पून्हा आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊ  शकते. या सर्व पाश्र्वभुमीवर सदर सर्व कंत्राटी कर्मचा-यांना कर्त्यव्यावर  कायम ठेवण्यात यावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिका-यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.