41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नायब तहसीलदार यांची नियुक्ती केव्हा होणार?

नायब तहसीलदार यांची नियुक्ती केव्हा होणार?

0
46

blank

आमगाव,दि.30ः- येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांचे पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयाचे चकरा माराव्या लागत आहेत. कामे होत नसल्याने नागरिक कंटाळले आहेत. याकडे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी लक्ष देवून नायब तहसीलदाराची नियुक्त करावी, अशी मागणी आमगाव नगरातील जनतेने केली आहे.
आमगाव तहसील कार्यालयातील महसूल विभाग वाळवंटासारखं ओसाड दिसून येत आहे. शासनाकडून नागरीकांसाठी र्शावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, सेतू सुविधा, इतर महसूल योजना राबविण्यात येतात. पण कित्येक महिने होऊनही नायब तहसीलदार यांची रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. येथील तहसीलदार दयाराम भोयर यांच्या मदतीला ३ नायब तहसीलदार असायला हवे, पण सद्यस्थितीत एक नायब तहसीलदार पद कार्यान्वित आहे. यामुळे नागरिकांची कामासाठी गैरसोय होत आहे. येथील नायब तहसीलदार सुट्टीवर असल्याने संपूर्ण जबाबदारी तहसीलदार यांच्याकडे आलेली आहे. तर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे नगरातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. कामासाठी वारंवार कार्यालयाच्या चकरा मारूनही काम होत नाही. यात नागरिकांना वेळ व भुदर्ंड सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकारी खवले यांनी लक्ष केंद्रीत करून नायब तहसीलदारांचे पदे त्वरित भरावे, अशी मागणी केली जात आहे.

blank