*”सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार– तसेच महासंघात प्रवेश
भंडारा -: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक जिल्हा भंडारा च्या वतीने भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या साठी 5 जुलै 2021ला भंडारा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे व आयटक चे पुढारी कॉम्रेड शिवकुमार गणवीर ,कॉम्रेड माधवराव बांते ,कॉम्रेड हिवराज उके व काॅ. गजानन लाडसे यांनी केले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित किमान वेतन मागील फरकासह लागू करणे इत्यादी 9 मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एस के पानझाडे जि.प.भंडारा यांना सादर करण्यात आले. त्यावर ते म्हणाले बिडिओ च्या मासिक मिटिंग मध्ये युनियन च्या दोन प्रतिनिधींना पाचारण केले जाईल. तसेच सेवा जेष्ठता यादी पंधरा दिवसात जाहीर केले जाईल ,भविष्य निर्वाह निधी इत्यादी बँकेत जमा केल्यावर पावती देणे , दहा टक्के आरक्षण, सामाजिक सुरक्षा ,जेष्ठता यादी पंधरा दिवसात जाहीर करणे ,अँड्रॉइड मोबाईल देणे अतिरिक्त कामावर प्रतिबंध लावणे इत्यादी मागण्यांचे समाधान केले जाईल असे डॉक्टर पानझाडे म्हणाले.
शिष्टमंडळात कॉम्रेड शिवकुमार गणवीर ,कॉम्रेड माधवराव बांते,काॅ. हिवराज उके ,कॉम्रेड गजानन लाडसे,जयप्रकाश मेहर ,गौरीशंकर धुमणखेडे, हेमराज शरणागत ,जागेश्वर राऊत ,नंदकिशोर काळबांडे इत्यादी कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.आंदोलनाच्या ठिकाणी ग्रामपंचायत कोष्टी तालुका तुमसर चे सेवानिवृत्त कर्मचारी श्री राजाराम खटोले यांचा युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला तर साकोली तालुक्यातील वळद ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्री जागेश्वर राऊत आपल्या अनेक सहकार्यांसह महासंघात सहभागी झाल्याबद्दल त्यांचेही स्वागत सत्कार करण्यात आले.व या आंदोलनाची सांगता करण्यात आली.
3 Attachments