एनएनटीआर व्याघ्रप्रकल्पाच्या नवेगावभागात आढळला ‘ब्लॅक लेपर्ड’

0
140

गोंदिया,दि.05ः गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव अभयारण्यात दुर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ (काळा बिबट) आढळल्याने वनप्रेमीमध्ये उत्साह संचारला आहे. ही दूर्मिळ बिबट्याची जोडी अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात वार्षीक प्राणी गणनेदरम्यानटिपली गेली असून हे छायाचित्र मार्च- मे महिन्यातील असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे.याबाबत अजूनपर्यंत डब्ल्यूआयआयने पूर्णत: खुलासा केलेला नाही.मात्र सोशल मिडीयावरील व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसरंक्षक व क्षेत्रसंचालक एम.राजानुजन यांनी नवेगाव परिसरातील फोटो असल्याचे म्हटले आहे.

दूर्मिळ असलेला ब्लॅक लेपर्ड दिसल्याने  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्या आढळल्याची नोंद आहे. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक डाँ बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्याचे सोशल मिडियातूनच कळल्याचे रामानुजन यानी म्हटले आहे.. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह लँडस्केपचा उल्लेख केला आहे. पण या जोडप्याच्या ठिकाणी असलेल्या अभयारण्याची अचूक माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अधिवास नष्ट होणे आणि शिकार केल्यामुळे भारतीय बिबट्या एक असुरक्षित प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहेत. त्यात या बिबट जोडीचे दिसणे एक आश्चर्याची बाब समजली जात आहे.

ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले दृश्य

नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्रात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. या अभयारण्याचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेला. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. याबाबात वनविभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

बिबट्यांची जोडी कॅमेरा ट्रॅप पिक्चर कॉर्टिंगमध्ये दिसून येत असून ती नवेगाव अभयारण्यातील आहे.यासंदर्भात सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोनंतर हे समोर आले असून एनएनटीआर फील्ड स्टाफकडून कॅमेरा ट्रॅपचा वापर राबविला जात आहे. ‘डेटा’ विश्लेषणासाठी डब्ल्यूआयआयकडे पाठविला गेला आहे. अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल,
– मणिकंद रामानुजम,
मुख्य वनसंरक्षक तथा फील्ड डायरेक्टर, नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह प्रकल्प.