कंत्राटी नर्सेसला मुदतवाढ द्या-जिल्हाधिकारी व आमदाराना आयटकतर्फे निवेदन

0
26
 भंडारा  -: कोविड -19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर कंत्राटी स्वरूपात आरोग्य सेविका ( ANM) म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. भंडारा यांनी 13 एप्रिल 2021रोजी तीन महिन्याचे नियुक्ती आदेश दिले.
 त्यांची मुदत 12 जुलैला समाप्त होत आहे. त्यांना त्वरित मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या नेतृत्वात6 जुलैला  जिल्हाधिकारी संदीप कदम व नरेंद्र भोंडेकर आमदार भंडारा विधानसभा यांच्या नावे निवेदन देण्यात आले.12 जुलै पर्यंत कंत्राटी नर्सेस ( आरोग्यसेविका )यांना मुदतवाढ न मिळाल्यास 13 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सामूहिक धरणे आंदोलन करण्यात येईल असे  निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तेव्हा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती ,वर्धा व इतर जिल्ह्याप्रमाणे त्वरित मुदतवाढ द्यावी तसेच माननीय आमदारांनी माननीय मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याशी बोलून शासन स्तरावरून तसे आदेश निर्गमित करावे असेही कॉम्रेड हिवराज उके यांनी म्हटले आहे. शिष्टमंडळात मनीषा तीतिरमारे,  वैशाली लेंडे, शुभांगी खरोले ,ऋतुजा साठवणे, माधुरी पवारे इत्यादींचा समावेश होता.