जि.प.पोटनिवडणूकिसाठी 268 उमेदवारांचे नामांकन

0
20

अकोला-जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर विविध पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 169 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आता अर्जांची छाननी,अर्ज मागे घेणे या प्रक्रियेत किती उमेदवार बाद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीला आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेतील सत्तारुढ आणि विरोधक त्यांच्या जागा कायम ठेवतात की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक उमेदवारांची चुरस अकोला तालुक्यात जिल्हा परिषद विभागासाठी 29 उमेदवार तर पंचायत समिती गणांसाठी 29 उमेदवार असे 68 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांची पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीत आज 89 उमेदवारांनी 92 अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 99 उमेदवारांचे 102 दाखल करण्यात आले आहे. तर विविध तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध गणांसाठी आज शेवटच्या दिवशी 159 उमेदवारांनी 163 अर्ज दाखल केले. विविध तालुक्यातील पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 169 उमेदवारांनी 174 अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेतील सत्तारुढ वंचित बहुजन आघाडीला धक्का देण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आघाडी करत लढत आहे. तर भाजपा व काँग्रेसने स्वबळावर आपले उमदेवार रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी ही लढत तिरंगी तर काही ठिकाणी दोन उमेदवारांमध्ये होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या हातातून जिल्हा परिषदेची सत्ता जाते की राहते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. उमेदवारांच्या अर्ज माघारीनंतर किती अपक्ष उमेदवार रिंगणात राहतात त्यावर विजयाचे गणित निश्चित होणार असल्याने या निवडणुकीत आता ग्रामीण भागात हळुहळू रंगत निर्माण होत आहे.