जगत महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

0
15

गोरेगाव ,दि.१५: जगत कला, वाणिज्य व इं.ह. पटेल विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.नीळकंठ लंजे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या अध्यक्षतेत रस्ता सुरक्षेसंदर्भात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपप्राचार्य डॉ.एच.एम.भैरम, पो.उपनिरीक्षक मोरे, प्रा.जे.बी. बघेले व्यासपीठावर उपस्थित होते. वक्र्तृत्व व निबंध स्पर्धेचा विषय ‘रस्ता सुरक्षा अभियान’ असा होता. वक्र्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनील टेंभरे याने तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक गुंजन लांजेवार, द्वितीय नंदकिशोर कटरे, तृतीय टिकेश्‍वरी रहांगडाले, पोस्टर स्पर्धेत प्रथम मीना पटले, द्वितीय राजकुमार चक्रवर्ती यांनी पटकावले. यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे फायदे सांगून प्रत्येकाने ते पाळण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व संचालन डॉ.सी.एस. राणे यांनी तर आभआर रीतू चौधरी यांनी मानले.