दिव्यांगांना मोफत मोटराईज ट्रायसिकल

0
25

गोंदिया : दिव्यांगांना दैनंदिन जीवन जगत असताना येत असलेल्या अडचणींकडे बघता त्यांना थोडाफार आधार देता यावा, यासाठी आता आमदार विनोद अग्रवाल यांनी दिव्यांगांना मोफत मोटराईज ट्रायसिकल देण्याची संकल्पना मांडली आहे.यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्वाची अट असून, विशेष लिंकवरून संबंधितांना अर्ज करावयाचा आहे.

दिव्यांग बांधवांना आपली कामे करता येत नसल्याने ते अन्य व्यक्तीच्या भरवशावर असतात. यात दिव्यांगत्वाचे प्रमाण अधिक असलेल्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही एका व्यक्तीची गरज असते. एकंदर दुसऱ्यांच्या खांद्यावरच त्यांची जबाबदारी असते. अशात त्यांना या दैनंदिनी कामांसाठी आधार देता आल्यास त्यांना पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. यातूनच आमदार अग्रवाल यांनी दिव्यांगांना मोफत मोटराईज ट्रायसिकल देण्याची संकल्पना मांडली आहे. यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्वाची अट असून, विशेष लिंकवरून संबंधितांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावयाचे आहेत. तसेच काही अडचण असल्यास अभय गौतम व किशोर कटरे यांच्याशी संपर्क साधता येईल.