Home विदर्भ ठाणे घटनेचा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने केला काळ्या फिती लावून निषेध

ठाणे घटनेचा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने केला काळ्या फिती लावून निषेध

0

अर्जुनी मोरगाव- ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या ३० ऑगस्टला हातगाडी फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करतांना त्यांचेवर फेरीवाल्यानी भ्याड हल्ला केला.या हल्यात सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली तर दुसऱ्या हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली.पिंपळे यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे या हल्ल्यात जखमी झाले.या घटनेचा राज्यभर संघटनांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
अर्जुनी नगरपंचायत येथील अधिकारी/कर्मचारी यांनी काळ्या फिती लाऊन घटनेचा जाहिर निषेध केला.एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले.यावेळी निवेदनाद्वारे आरोपी अमरजीत यादववर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव,प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव,सुशांत अरु, प्रफुल्ल गाड़बैल,तुषार सांगोळे,दीपक डोंगरवार,दीपक राऊत,दुर्योधन नेवारे,मनीषा मेश्राम,कमल कोहरे,अश्विनी शाहारे उपस्थित होते.

Exit mobile version