41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ डांगे कार्यमुक्त अति.जिल्हाधिकारी राजेश खवले प्रभारी सीईओ

डांगे कार्यमुक्त अति.जिल्हाधिकारी राजेश खवले प्रभारी सीईओ

0
789

blank

गोंदिया,दि.01ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व महाज्योतीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीमुळे त्यांना गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हटविण्यात आले आहे.त्यांच्या जागी मुबंई येथील अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांची नियुक्ती शासनाने केली.पाटील गोंदिया जिल्हा परिषदेच्या सीईओपदी रुजू होईपर्यत गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याकडे तातडीने आज बुधवारला(दि.1)मध्यानंनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे(वर्मा )यांनी काढले.त्यामुळे खवले यांच्याकडे पुन्हा गोंदियाजिल्हा परिषदेच्या सीईओचा पदभार आलेला आहे.डांगे यांची सीईओपदावरुन हकालपट्टी झाल्याने त्यांची मुळ आस्थापना सध्या कुठेच नाही,त्यामुळे मूळ आस्थापनाच नसल्याने महाज्योती या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन त्यांची आपसुकच हकालपट्टी झाल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.