41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ अनिल पाटील यांनी स्विकारला झेडपी सीईओचा पदभार

अनिल पाटील यांनी स्विकारला झेडपी सीईओचा पदभार

0
172

blank

गोंदिया,दि.03ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे वादग्रस्त राहिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी गुरुवारला(दि.2) गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारला.पदभार स्विकारताच त्यांचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने आज(दि.3) स्वागत करण्यात आले.यावेळी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे,संतोष तुरकर,गुणवंत ठाकूर,मनोज मानकर,सुभाष खत्री,अजय खरवडे,नेवारे,सतोंष तोमर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.