आमदार रहांगडालेंच्या हस्ते ३०.०० लक्ष मंजूर विविध विकास कामाचे भूमिपूजन

0
43

तिरोडा,दि.04ः-तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील गोंदिया गोंदिया तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले यामध्ये एकोडी येथे एकोडी येथिल प्राथमिक शाळेला आवरभिंत बांधकाम व सौदर्यीकरण, जि.प.हायस्कूल येथे पेव्हर ब्लाक लावणे, प्राथमिक शाळा रामपुरी येथे पटांगनावर पेव्हर ब्लाक लावणे असे एकूण ३०.०० लक्ष, बांधकामाचा समावेश असून भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले,माजी जि. प. उपाध्यक्ष मदन पटले, माजी उपसभापती डॉ.वसंत भगत, एकोडी सरपंच शालूताई चौधरी,उपसरपंच वर्षाताई अंबुले, भाजप जिल्हा सचिव अजाब रीनाईत,महेंद्र बघेले,माजी जि. प. जि. प. सदस्य रेखाताई चौधरी,माजी प. स. सदस्य पवन पटले, खेमेन्द्र तिडके,माजी उपसरपंच किरण मेश्राम,ग्रा.प. सदस्य पुरुषोत्तम भदाडे, राकेश बिसेन, जगजीवन वधारे,दीपक रिणाईत, शुभम बोदेले,शबनम पठाण, संगीता रिणाईत, वहिदा शेख, रंजु पटले, संगीता वरठी, बेनुताई बिसेन, खालीकभाई पठाण, हमजाभाई शेख,पंकज मेश्राम व गावकरी उपस्थित होते.