Home विदर्भ गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवताना मूर्तिकाराचा मृत्यू

गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवताना मूर्तिकाराचा मृत्यू

0

यवतमाळ-शहरातील नामवंत मूर्तिकार स्नेहल बंडू वनकर यांचे शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवत असताना ही दुर्दैवी घटना घडली. ते 50 वर्षांचे होते.
वनकर परिवार केवळ विदर्भातच नव्हे तर विदेशातही गणपती, दुर्गादेवी आणि इतरही विविध देखण्या मूर्त्यांसाठी प्रसिद्ध होते. यवतमाळच्या मोक्षधामातील भगवान शिवाची मूर्तीही त्यांनी तयार केली होती. त्यांचे वडील कै. बंडू वनकर, जुळा भाऊ कै. सचिन हेदेखील प्रसिद्ध मूर्तिकार होते. गणेशचतुर्थी असल्याने शुक्रवारी सकाळपासून ते गणेशमूर्त्यांवर अखेरचा हात मारण्यात व्यस्त होते. त्यातच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version