Home विदर्भ गणेशनगर येथे विद्युत धक्क्याने म्हशीचा मृत्यू, पंचवीस हजाराचे नुकसान

गणेशनगर येथे विद्युत धक्क्याने म्हशीचा मृत्यू, पंचवीस हजाराचे नुकसान

0

अर्जुनी मोरगाव-शहरातील गणेशनगर येथील संविधान चौकात विद्युत धक्क्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार 11 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता दरम्यान घडली. सुदैवाने मनुष्य हानी चा मोठा अनर्थ टळला.सदर म्हैस बळीराम बाळबुद्धे यांची असून त्यांचे 25 हजाराचे नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार गणेश नगर येथील गोपालक बळीराम बाळबुद्धे जनावरांना चारायला जात होते.संविधान चौकात नगरपंचायत द्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलयंत्र लावण्यात आले.तीन वर्षांआधी लावल्या पासून ते बंद आहे.या यंत्रासाठी विद्युत खांब लावण्यात आला.याच खांबाच्या विद्युत गळतीमुळे सभोवताल पसरलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह सुरु होता. चरायला जात असणाऱ्या जनावरांपैकी एक म्हैस खांबाजवळ गेली.विद्युत धक्क्याने ती जागेतच मृत्यू पावली हा प्रकार बघून बाळबुद्धेनी तिकडे धाव घेतली.त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच त्यांना विद्युत धक्का बसला.मात्र ते कसेबसे पाण्याबाहेर निघाल्याने थोडक्यात बचावल्याने जीवित हानी टळली.घटनेची नोंद पशुवैद्यकीय विभाग,पोलिस स्टेशन आणि विद्युत विभागाणे घेतली.

Exit mobile version