सावली वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट

0
41

सावली-तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाडखुर्द उपक्षेत्र अंतर्गत येणार्‍या गायडोंगरी नियतक्षेत्रातील गट क्रमांक 108 मधील शेतशिवारालगत मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार, 12 सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
घटनेची माहिती वनविभागाला होताच वन विभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वन्यप्राण्यांच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंचनाम्याची कारवाई पूर्ण करून बिबट (मादी) चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. यावेळी सहाय्यक वनरक्षक (तेंदु) चौरे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी. कांबळी, डॉ. छोनकर, मुकेश भादेकर, उमेश जिरे आदी उपस्थित होते.