लाखनी,दि.17ः-देशातील दळणवळण व परिहवन क्षेत्रात महत्वाचा घटक असलेल्या वाहनचालकाची भूमिका पटवून देण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावर आज 17 सप्टेंबरला चालक वाहक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करुन वाहनचालकांचे स्वागत करुन नियमांची माहिती करुन देण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गडेगाव महामार्ग पोलीस केंद्राच्यावतीने वाहनचालक दिवसाचे कार्यक्रम आयोजित करुन वाहनचालकांना माहिती देण्यात आली.अशोका टोलप्लाझा,सेंदुरवापा येथील टोलनाका,लाखनी बसस्थानकासमोर संघर्ष वाहन चालक संघटनेसोबत आणि महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी वाहनचालकाचे मनोबल वाढविण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच वाहनचालविण्याचे नियमाची माहिती देण्यात आली.