महामार्ग पोलीस केंद्र गडेगावच्यावतीने चालक दिवस कार्यक्रम साजरा

0
39

लाखनी,दि.17ः-देशातील दळणवळण व परिहवन क्षेत्रात महत्वाचा घटक असलेल्या वाहनचालकाची भूमिका पटवून देण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावर आज 17 सप्टेंबरला चालक वाहक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करुन वाहनचालकांचे स्वागत करुन नियमांची माहिती करुन देण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गडेगाव महामार्ग पोलीस केंद्राच्यावतीने वाहनचालक दिवसाचे कार्यक्रम आयोजित करुन वाहनचालकांना माहिती देण्यात आली.अशोका टोलप्लाझा,सेंदुरवापा येथील टोलनाका,लाखनी बसस्थानकासमोर संघर्ष वाहन चालक संघटनेसोबत आणि महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी वाहनचालकाचे मनोबल वाढविण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच वाहनचालविण्याचे नियमाची माहिती देण्यात आली.यावेळी टोल मॅनेजर राय,संघर्ष वाहन चालक संघटनेचे दत्ता मेश्राम,वाहतुक शाखा नियंत्रण पोलीस निरिक्षक शिवाजी कदम,टोल मॅनेजर कुमार जायस्वाल,सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के,इंडिया पँथरचे सामाजिक कार्यकर्ते बिरबल हलमारे आदीनी सहकार्य केले.या कार्यक्रमांतर्गत 110 ते 120 वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महामार्ग पोलीस केंद्र गडेगावचे प्रभारी अधिकारी प्रमोद बघेले,पोलीस उपनिरिक्षक अमित पांडे,नितिन आगाशे आदी अधिकारी व वाहतुक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.