“आम्ही सिद्ध लेखिका” संस्थेच्या वतीने सालेकसा येथे महिला विद्यार्थ्यांसाठी जागृती उपक्रम

0
20

▪️26 सप्टेंबर ला लेखन कलागुण प्रोत्साहन पर विविध स्पर्धा व उच्चविद्या विभुषीत मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम

गोंदिया:- तळागाळातील महिला विद्यार्थ्यांना जागृती उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातील लेखन कौशल्य व कलागुणानां प्रोत्साहन देऊन त्याना मंच उपलब्ध करुन देण्यासाठीची पायाभरणी म्हणून “आम्ही सिद्ध लेखिका” व “संविधान मैत्री संघ” संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “लेखन कलागुण प्रोत्साहन पर विविध स्पर्धा व उच्चविद्या विभुषीत मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम” रविवार दि. 26 सप्टेंबर 2021 ला पंचायत समिती सभागृह, सालेकसा येथे सकाळी 10:00 वाजता पासून आयोजित करण्यात आले आहे. या जागृती कार्यक्रमा अंतर्गत लेखन प्रोत्साहन पर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सकाळी 10 वाजता “निबंध लेखन स्पर्धा” (विषय- “महिला सशक्तीकरण”- 1) महिलांचे संविधानानुसार घटनादत्त अधिकार, 2) महिलानी स्वत:ची सुरक्षा कशी करावी, 3) तुम्हाला पत्रकार व्हावे वाटते काय? वरिल तीनही विषयामधून एक विषयावर आपले मत मांडणे आहे .शब्द मर्यादा 200 ते 250 / वेळ- 30 मिनिट), सकाळी 11 वाजता जागर मार्गदर्शन, सकाळी 11:30 वाजता काव्य सुमनांजली, दुपारी 12 वाजता पासुन बौद्धीक स्पर्धा घेण्यात येतील त्यामध्ये दुपारी 12 वाजता- काव्य वाचन स्पर्धा (विषय-सर्वसामान्य विषयावर स्वयं रचित काव्य वाचन -प्रस्तुती वेळ मर्यादा-5 मिनीटं), दुपारी 12:30 वाजत बोधकथा कथन स्पर्धा- (प्रस्तुती वेळ मर्यादा-5 मिनीटं), दुपारी 1:00 वाजता सांस्कृतिक स्पर्धेत लोकगीत गायन स्पर्धा दुपारी 1:30 वाजता पारंपारिक नृत्य स्पर्धा (गोंडी किंवा अन्य संस्कृती पारंपारिक एकल किंवा सामूहिक नृत्य- प्रस्तुती वेळ मर्यादा-5 मिनीटं) घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे पूरस्कार वितरण कार्यक्रम दू.2:00 वाजता ठेवण्यात आले. प्रथम, द्वितीय, तृतीय सोबत भाग घेणा-या सर्वच प्रतिभागी स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात येईल आणि उच्चविद्याविभुषीत मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून विद्यापीठीय सुप्रसिद्ध लेखिका, रचयीता गोंडवाना दर्शन उषाकिरण आत्राम, आम्ही सिद्ध लेखिका नागपुरच्या प्रा.विजयाताई मारोतकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. दिशा गेडाम (अध्यक्ष- आम्ही सिद्ध लेखिका गोंदिया जिल्हा, प्राध्यापिका एस एस गर्ल्स कॉलेज गोंदिया) उपस्थीत राहतील.
महिलां व विद्यार्थ्यांमधील साहित्य लेखन आणि कला कौशल्य जगासमोर यावे त्याकरिता सतत  विविध नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. आपल्या संस्कृती बद्दल जागृत असणे ही काळाची गरज आहे. इतिहासातून बोध घेत सदर वैचारिक कार्यक्रमाच्या माध्यमाने जागृती घडवीण्याच्या उपक्रम राबविला जात आहे. आपल्या विचारांना प्रत्यक्ष गती लाभावी त्या करिता आपल्या मुळ संस्कृतीची माहिती प्रत्येकांना व्हायला हवी. त्यात विशेषत: विद्यार्थी युवा वर्गाचा चा समावेश करून विविध स्पर्धांच्या माध्यमाने ते शोध अभ्यास करतील हा ऊद्देश्य ठेऊन कार्यक्रम आयोजिला आहे. सदर स्पर्धा मार्गदर्शन कार्यक्रमात अधिकाधीक विद्यार्थी महिलानी हिरिहिरीने भाग घ्यावा असे आवाहन “आम्ही सिद्ध लेखिका” गोंदिया जिल्हा शाखा च्या वतीने डॉ.सुवर्णा हुबेकर, प्रा.डॉ.कविता राजाभोज, यशोधरा सोनवणे, वंदना कटरे, प्रा.अनिता कोडापे, पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले यानी केले आहे. स्पर्धेत नि:शुल्क भाग घेणा-यांसाठी संस्थेकडून 9049808909, 7499493944 नम्बर जारी करण्यात आले आहे.