गोंदिया,दि.11- कॉविडची दुसरी लाट सर्वांनी अनुभवली आहे, तशी दाहकता जर टाळणे असेल तर आपण लसीकरण करून घेऊन सरंक्षित होणे गरजेचे आहे.
आरोग्य विभाग तर्फे मिशन कवच कुंडल व्यपक प्रमाणात राबविण्यात येत आहे जिल्हाधिकारी डॉ नयना गुंडे यांच्या आवाहन नुसार ग्राम पंचायत गर्रा तर्फे कॉविड लसीकरणाची व्यापक जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे युवा सरपंच कुलदीप पटले स्वतः या मिशन मध्ये सामील झाले आहेत व गावकर्यांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
या कॅम्पेन मध्ये ग्रामसेवक आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच लसीकरण स्टाफ 100 टक्के लक्ष पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. यासाठी टीम मध्ये सरपंच कुलदिप पटले गर्रा बु.,उपसरपंच आशीष मिश्रा सर्व ग्राम पंचायत
ग्राम विकास अधिकारी धांडे सर,नोडल अधिकारी वैभव फरकुंडे सर,आशा सेविका,आंगनवाड़ी सेविका,पोलिस पाटिल,तंटा मुक्ति अध्यक्ष,आदी लसीकरण मिशन कवच कुंडल ला सहकार्य करीत आहेत.