पवार शब्द ओबीसी यादीत समाविष्ठ करण्याकरीता शिष्टमंडळ भेटले सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिवांना

0
29

नागपूर,दि.११ः- केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये आधी असलेले पवार जात शब्द पुर्ववत करण्यात यावे या मागणीला घेऊन सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव आर. सुब्रेमान्यम  यांची भंडारा-गोंदियाेच खासदार सुनिल मेंढे यांच्या नेतृत्वात भेट घेत अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे श्रावण फरकाडे व मोरेश्वर भादे यांनी सविस्तर चर्चा केली.
पवार जात शब्द केंद्रीय ओबीसी यादीमध्ये पूर्ववत जोडण्यासाठी सुरु असलेल्या अभियानातर्गत दिल्ली येथे नागपूरच्या समाज प्रतिनिधीनी मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आर.आय.रामकुमार रिसर्च इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर (महाराष्ट्र प्रदेश ) यांची भेट घेत महाराष्ट्र आयोगाचे प्राप्त पत्र नवीन निवेदन दिले.यावर लवकरच चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या मुद्माला घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत मंत्री सामाजिक न्याय यांच्यासोबत चर्चा केली.सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिवांनी यादीत हा घोळ 1996 -1998 च्या दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करीत जुने कागदपत्रांचा अभ्यास करुन न्याय देण्याचे आश्वासन दिले.