Home विदर्भ ईटेंडरिंग रद्दकरीता मजुरसंघाचे नागपूरात आंदोलन

ईटेंडरिंग रद्दकरीता मजुरसंघाचे नागपूरात आंदोलन

0

गोंदिया,दि.16-नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मजुर संस्थांच्या संघाच्यावतीने ई टेंडरिंग प्रकियेत बदल करुन ती प्रकियाच रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.त्या आंदोलनात आज बुधवारला गोंदिया जिल्हा मजुर सहकारी संघाशी सलग्न असलेल्या मजुर संस्थाच्या प्रतिनिधीनी माॅरिस काॅलेज परिसरातील आंदोलनात सहभागी होऊन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक राजू एन.जैन,पंचायत समिती सदस्य केवलराम बघेले,बंटी मिश्री,सुनिल पालांदूरकर,प्रतिक कदम,संतोष भेलावे,चांदेवार,ओंकार शरणागत,पटले यांच्यासह गोंदिया,तिरोडा,देवरी,गोरेगाव आदी भागातील मजुरसंघाचे पदाधिकारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version