Home Top News दिल्लीमध्ये दोन जिहादी दहशतवाद्यांना अटक

दिल्लीमध्ये दोन जिहादी दहशतवाद्यांना अटक

0

वृत्तसंस्था

नवी दिल्ली,दि.16 – दिल्लीमध्ये नाताळ व नव्या वर्षाच्या सुमारास मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची योजना आखणाऱ्या दोन संशयित जिहादी दहशतवाद्यांना दिल्ली पोलिस दलाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी उत्तर प्रदेश जिल्ह्यामधील संभल जिल्ह्यामधील असल्याचे आढळून आले आहे. या दोघांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. 

उत्तर प्रदेशमध्ये संशयित दहशतवाद्यांच्या शोधार्थ विशेष मोहिम राबविण्यात येत असून अटक करण्यात आलेल्या दोघांच्या हालचालींवर विशेष पथकाचे अनेक महिन्यांपासून लक्ष होते. या दोन दहशतवाद्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होऊन घातपाती कृत्यांचे प्रशिक्षण घेतले होते. नाताळ व नव्या वर्षाच्या प्रारंभास काहीच दिवस राहिले असताना हा धोकादायक दहशतवाद्यांना झालेली अटक, हे सुरक्षा दलासाठी मोठे यश मानण्यात येत आहे. 

Exit mobile version