जिल्ह्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण

0
18
*भारतीय सैनिकाच्या हस्ते पिंडकेपार शाळेत ध्वजारोहण*
गोरेगाव- स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी अनेक ठिकाणी ध्वजारोहण हे गावचे प्रथम नागरिक अथवा शालाव्यावस्थपण समिती अध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधींच्या  हस्ते केले जाते. मात्र गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परीषद शाळा पिंडकेपार येथे माझी विद्यार्थी भारतीय सैनिकाच्या  हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2022 रोजी ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी लढणाºया सैनिकांबद्दल आदर, सन्मान, प्रेम व्यक्त व्हावा या उद्देशानेच या प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे असे येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत घासले यांनी सांगितले आहे.
देशाच्या रक्षणासाठी सिमेवर भारतीय सैनिक ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र डोळ्यात अंजन घालून सेवा बजावत आहेत. देशाच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देखील दिली आहे. भारतीय सैनिकांमुळे देशातील प्रत्येक नागरिक बिनधास्तपणे जीवन जगत आहे. देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही माजी सैनिक वेगवेगळ्या माध्यमातून देशसेवेला हातभार लावतात मात्र त्यांना मानसन्मान दिल्या जात नाही असे चित्र ही अनेक ठिकाणी दिसून येते.स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्याची परंपरा ग्रामपंचायत  मध्ये सरपंच, शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किंवा मुख्याध्यापक, संस्थापक , लोकप्रतिनिधीचा हस्ते अनेक कालावधीपासून ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू आहे. परंतु ही परंपरा येथिल शाळव्यावस्थपण समितीचे अध्यक्ष भरत घासले, मुख्याध्यापक पी डी पटले  व  व्यवस्थापन समितीचेसर्व सदस्यांनी मोडून काढली आहे.
यावर्षीचे ध्वजारोहण माजी विद्यार्थी भारतीय सैनिक अजय ठाकरे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच दुलीचद रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत घासले, मुख्याध्यापक पी डी पटले, ग्रांम पंचायत सदस्य भीमा शहारे, सुनीता भोगारे, सुशीला टेंभुर्णीकर, सहायक शिक्षिका सुनंदा ब्राह्मणकर , युवराज बोपचे, पी एल पारधी, आंगणवडी सेविका टेंभूरनिकर , नीला पटले, भूनेश्वरा चौधरी व भोजन व्यवस्था कर्मचारीसह गावातील मान्यवर, कर्मचारी, नागरिक, आजी- माजी पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रथेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोरवाई येथे जि.प.सदस्या लक्ष्मी तरोणेंचा प्रजासत्ताकदिनी सत्कार
73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद क्षेत्र आसोली च्या जि.प.सदस्या सौ.लक्ष्मीताई रविशंकर तरोणे व त्यांचे मार्गदर्शक  भाऊलाल तरोणे यांनी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरवाही येथे सदिच्छा भेट देत प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात हजेरी लावली.यावेळी प्रसंगी नवनियुक्त जि.प.सदस्य सौ.तरोणे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. तत्पश्चात जि.प.सदस्या लक्ष्मी तरोणे यांच्या हस्ते मोहगुणी या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गोरेगांव- तालुकातील मोहाडी येतील आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रा.प.चे माजी सरंपच धु्र्वराजभाऊ पटले हे होते. संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी. चौरागडे,सदस्य जे.जे.पटले,हिरालाल महाजन,प्रमानंद तिरेले,माजी उपसरपंच श्रीराम पारधी,टिकाराम भोयर,लक्षीराम भोयर, मुकेश येरखडे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवराच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.आशा चेचाने,बंटी पटले,दुर्गैश चेचाने,प्रविन येरखडे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी सरंपच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले.