34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ स्वतंत्र विदर्भ राज्य आम्ही घेणारच;विदर्भ आंदोलन समितीची हुंकार

स्वतंत्र विदर्भ राज्य आम्ही घेणारच;विदर्भ आंदोलन समितीची हुंकार

0
145

blank

भंडारा: छत्तीसगढ,उत्तरांचल व झारखंड हे तीन राज्याची निर्मिती करण्यात आली. परंतु, महाराष्ट्रातील राजकारणामुळे विदर्भ राज्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. भाजपने सन २०१४ मध्ये विदर्भ राज्याच्या नावाखाली मते मागितली. मात्र आता दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सातत्याने विदर्भराज्य आंदोलन समितीकडे स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जात आहे. परंतु, सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे (ता.७) भंडारा आयोजित असलेल्या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी हुंकार भरून स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला आहे.
भंडारा येथे स्वतंत्र विदर्भराज्य आंदोलन समितीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अॅड. वामनराव चटप तर उदघाटक म्हणून लोकनेते तथा किसान बिग्रेडचे प्रमुख प्रकाश पोहरे, त्याचबरोबर मार्गदर्शक म्हणून महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, प्रा. प्रभाकर कोडबत्तुनवार, माजी राज्यमंत्री रमेश गजबे,
मुकेश मासुरकर, अॅड. सुरेश वानखेडे, काकासाहेब मते, अहमद कादर, नासीर जुम्मन शेख आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांना विदर्भघेतल्याशिवाय स्वतंत्र बसणार नाही, असा हुंकार भरला. या मेळाव्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील अतुल सतदेवे, वसंत गवळी, भोजराज ठाकरे, सी.पी. बिसेन, छैलबिहारी अग्रवाल, सुंदरलाल लिल्हारे, पंचशिला पानतवणे, दिपा काशिवार, प्रशांत नखाते, नरेश निमजे, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, खुणे पाटील, वजीर बिसेन, भुपेंद्र पटले, रमेश बिसेन, बंडू वैद्य, अरूण बन्नाटे, यशवंत रामटेके, ज्ञानेंद्र आगासे, भगवान जंगाळ, अॅड. पी. एन. टेंभुर्णीकर,आय. एच. मेश्राम, सौरभभांडारकर, भाऊराव बन्सोड, रामचंद्र रोकडे, नेपाल मारगाये, दुर्वास धार्मिक, संजय नवखरे, रमेश वळके, किशोर सोनवाने, प्रमोद जिभकाटे, अमित हुमणे, दुर्योधन वैद्य, दीपाली सेलुकर, डॉ निरज खोब्रागडे आदि उपस्थित होते.

blank