कर्जबाजाराला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

0
15

तुमसर दि.९-: पवनारा येथील एका अविवाहित शेतकर्‍याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रोशन खेडकर (२५) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली.
शिवाजीची आईरेखा यांच्या नावावर पवनारा येथे पावने दोन एकर शेती आहे. सन २0१३ मध्ये रेखा आई यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून २९ हजाराचा कर्ज घेतला होता. नापीकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. २९ हजाराच्या कर्जावर १0 हजाराचा व्याज झाला. ४0 हजार १४८ रुपयांचा कर्जाचा डोंगर झाला. ही रक्कम परत कशी करायची असा प्रश्न खेडकर कुटुंबीयांना पडला. आर्थिक विंवचनेत शिवाजीने ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बहिनीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
चार भाऊ एक बहिण हा आई असा परिवार आहे.