मुंडीपार ग्रामपंचायत कार्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी

0
24

गोरेगांव:-गोरेगांव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील ग्रा.पं. कार्यालयात दिनांक 14 एप्रिलला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वीं जयंती निमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.
भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक असलेल्या बाबासाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी दलित ,बौद्ध,शोषित,पिडीत वंचित,लोकांच्या चळवळीला प्रेरणा दिली आणी अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली.अशा महामानवास अभिवादन करण्यासाठी ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये,, उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी, माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे, ग्रा.पं. सदस्य दिनेश दिक्षीत, चंद्रगुप्त धमगाये, छायाबाई चौधरी, वनव्यवस्थापन अध्यक्ष टुकेंद्र भगत,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,पंढरीजी कटरे,धाडुजी बिसेन ,बलीरामजी शरणागत,दामोदरजी बिसेन,राजेंद्र बिसेन,रमेश धमगाये,सुनिल वाघाडे, अजय नेवारे, योगेश गमधरे इत्यादी उपस्थित होते.

*राणा भवन येथे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन* 
भंडारा -: भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती प्रित्यर्थ 14 एप्रिल ला सकाळी 9 वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय राणा भवन भंडारा येथे ज्येष्ठ कॉम्रेड गोपाल चौकर यांच्या हस्ते आणि भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे समन्वयक कॉम्रेड  हिवराज उके यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
 कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड गजानन पाचे  यांनी केले.  तर कार्यक्रमाला   दिलीप क्षीरसागर, सुभाष मेश्राम,  पराग मते,निळकंठ सकतेल, गौतम भोयर, गोपाल चोपकर इत्यादींचे सहकार्य लाभले.
अण्णाभाऊ साठे चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*
  भंडारा -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती प्रित्यर्थ दिनांक 14 एप्रिल ला सकाळी  11 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक भंडारा येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी संघ कार्यवाह श्रीराम चाचेरे , सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ ढोके आणि भाकप चे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके   यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था भंडाराेचे वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे समन्वयक काॅ. हिवराज उके  यांनी केले. प्रास्ताविक भाषणात काॅ.हिवराज उके यांनी देश व संविधान संकटात आहे. खाजगीकरून देशाची साधन संपत्ती विकली जात आहे. परिणामी आरक्षण समाप्त होत आहे. आणि बेरोजगारी वाढत आहे. अन्याय अत्याचार वाढले आहेत. ते सर्व थांबविण्यासाठी सरकारचे खाजगीकरणाचे धोरण हाणून पाडावे लागेल आणि संवैधानिक मूल्य- सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प केला पाहिजे हाच जयंती दिनाचा संदेश होय असेही काॅ. हिवराज उके म्हणाले. तर देश संविधाना शिवाय चालणार नाही, संविधानाला व आरक्षणाला संघाचा पूर्ण समर्थन आहे असे श्रीराम चाचेरे म्हणाले. याप्रसंगी सामाजिक संस्थेच्या वतीने श्री राम चाचेरे, काॅ.हिवराज  उके,  अतुल दिवाकर, पंकज घाडगे, रामकृष्ण बिसणे,तिलक निंबेकर, स्वप्नील येवले, दत्ता वानखेडे, श्री मते, पत्रकार श्रीकोंडावार इत्यादींचे स्वागत करण्यात आले. आभार प्रदर्शन अनु डोके यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व श्री बाबासाहेब भास्कर जाधव, रमेश वाघमारे, किशोर खंडाळे, राजू वानखेडे, मनोहर खंडाळे, बापू खडसे, अनिल बावणे, सोमाजी निखाडे, दिनेश हापसे गौतम भोयर, इत्यादींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात बॅडवाजा ने तर शेवट मिठाईने करण्यात आली.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व खासदार सुनिलजी मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप
गोरेगांव:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मीत व भंडारा/गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका ग्रामीण रुग्णालय गोरेगांव याठिकाणी जि.प.सदस्य गोंदिया तसेच गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष भाजपा डॉ. लक्ष्मणजी भगत यांच्या वतीने फळवाटप करण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणी खासदार सुनिलजी मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात केक कापुन फळ वाटप करून जयंती व वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत,जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर,संचालक को.ऑप.बैक रेखलाल टेंभरे,नितीन कटरे, गिरधारी बघेले,ईश्वर सोनवाने,संजय बारेवार, हिराभाऊ राहांगडाले,डॉ.राहुल कटरे, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.