गणखैरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिम गीतांचा दुय्यम कव्वाली कार्यक्रम

0
42

गोरेगाव,दि.16ः- तालुक्यातील गणखैरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आयोजित भिम गीतांचा दुय्यम कव्वाली कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना रविकांत बोपचे म्हणाले की, महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात केल्यास बाबासाहेबांचा विचारांचा समाज निर्माण करणे सोपे होईल व यातुन समताधिष्ठित समाज घडून येणार, असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे होते.पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, एड.कृष्णा पारधी,आनंद चंद्रिकापुरे,एम.टी.दानी,प्रेमेंद्र कटरे,रंजित सरोजकर,उदाराम कांबळे,के.के.लांजेवार,श्री मौदेकर,चंद्रिकापुरे,ठाकरे,नामदेव नाईक,सुरेशकुमार पारधी, के.टी.राऊत,माणिक कांबळे,डॉ.पारधी,केसुजी चौवारे, माधव आदमाणे, सुनील आदमाणे, धाराताई तुप्पट सरपंच,प्रमिलाताई जांभुळकर ग्रा.प.सदस्य, वर्षाताई जनबंधु ग्रा.प.सदस्य,दिपालीताई कांबळे,भारती तुप्पट, शिंधुताई गौतम,रिनाताई शहारे पोलिस पाटील आदिंसह गावातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.