एक्यूट पब्लिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१वी जयंती उत्साहात साजरी

0
40

गोंदिया,दि.16ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, भारतरत्न, ज्ञानीपंडीत, अष्टपैलु व्यक्तिमत्त्व असणारे, ज्यांनी गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्का प्रती जागृत करून त्याची ज्योत समाजाच्या मनात सतत तेवत ठेवणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती एक्यूट पब्लिक शाळेत खूप उत्साहात करण्यात आली.या कार्यक्रमातर्गत विद्यार्थ्यानी गीते, भाषणे, नाटिका, वक्तृत्वस्पर्धा, चित्राकृती,प्रसंग इत्यादी सादर केले.स्पर्धा,नाटीका व चित्राकृतीद्वारे विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जीवनी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रेरणास्त्रोत श्रीमती गिताताई भास्कर, सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव शुभा शहारे ,प्राचार्य अमितकुमार ,आणि शिक्षक उज्वला पारधी,अनिता नेवारे,शाहीना अहमद,विनू अगाशे, खुशबू तुरकर,रागिणी शाहू,विद्या कोरे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश घालून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.