संविधानिक मुल्यांचा पालन करून बंधुभाव बाळगणे देशातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य- प्रा.डॉ. दिशा गेडाम

0
18

■ राष्ट्राची एकता व बंधुता प्रवर्धित करण्यासाठी संविधान जागर चिंतन बैठक सम्पन्न

गोंदिया:- “सध्या देशात जाती धर्मावरून माणसा माणसात द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्न होत आहे. अशी परिस्थिति येऊ नये याकरिता संविधानिक मुल्यांचा पालन करून प्रत्येक नागरिकांनी बंधुभाव बाळगावा. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या संविधानिक मुल्यांच्या तत्वानुसार माणसे जोडण्याचा संकल्प करण्यासाठी, प्रेम , मैत्री, करुणा या शाश्वत मूल्यांचा जागर करण्यासाठी, बंधुभावाचा भारत निर्माणासाठी प्रयत्नशील असणे काळाची गरज आहे . असाच एक प्रयत्न म्हणून “संविधान संस्कृतीचा जागर” हे एक आमचे पाऊल आहे” असे प्रतिपादन सर्वसमाज विचार महोत्सव समिति अध्यक्षा प्रा.डॉ. दिशा गेडाम यानी केले. स्थानिक रेस्ट हाऊस येथे संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार महोत्सव समिति च्या वतीने राष्ट्राची एकता व बंधुता प्रवर्धित करण्यासाठी आयोजित “संविधान जागर – चर्चा चिंतन” बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत समाजातील अनेक प्रश्न समस्यांवर समाधान शोधणारे सर्वसमाजातील चिंतनशील विचारवंताना आमंत्रित करण्यात आले होते. कामगार व महाराष्ट्र दिनी आयोजित या चर्चा बैठक प्रसंगी कोणताही भाषण अथवा भाष्य, गाणी संगीत, घोषणा, जयजयकार, जल्लोष करण्यात आले नाही, शांतता हेच मूल्य पाळले गेले. “विविधतेत एकतेचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशातील धर्मांमध्ये दुही माजवून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हल्ली हेतुपुरस्सर वरचेवर होत असलेले दिसत आहेत . परिसरात उन्माद, भय आणि सामाजिक ताणतणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आम्ही चिंतन मनन करणारे भारतीय नागरिक या वाढत्या घटनांमुळे अतिशय अस्वस्थ आणि व्यथित आहोत. आम्ही सामाजिक बंधुभाव, शांतता, प्रेम आणि सहिष्णुता ही संविधानिक मानवातावादी मूल्ये मानतो. समाजातील प्रश्न सोडविण्याचा मार्ग परस्पर संवादाचा असतो यावर आमचा ठाम विश्वास आहे. याला अनुसरून आम्ही सदर “संविधान जागर -चर्चा बैठक” उपक्रम, कार्यक्रम आखला आहे. महत्वाचे म्हणजे हा उपक्रम किंवा कार्यक्रम कुठल्याही संघटनेचा, पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. आम्ही आमची अस्वस्थता फक्त प्रेमाच्या मार्गाने व्यक्त करू इच्छित आहोत. राष्ट्राची एकता व बंधुता प्रवर्धित करण्यासाठी ‘संविधान जागर- चर्चा चिंतन बैठक’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे आयोजकांनी सांगितले.”

सर्वसमाज विचार महोत्सव समिति अध्यक्ष प्रा. डॉ. दिशा गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सम्पन्न झालेल्या या चिंतन बैठकीत शीतल कुंभारे, कु.हिना लांजेवार, कु.साक्षी भेलावे, कु.स्नेहा राऊत, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, महेश लांजेवार, ओबीसी संघर्ष कृति समिति चे कैलास भेलावे, कलाकार संघटनेचे दिलीप कोसरे, युवा बहुजन मंच चे सुनील भोंगाडे, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळचे वसंत गवळी, साहित्यिक सी.पी. बिसेन, साइकलिस्ट अशोक मेश्राम, राष्ट्रीय क्रीड़ा प्रशिक्षक दुलीचंद मेश्राम, एकात्मिक महिला बालविकास योजना प्रकल्प विस्तार अधिकारी तीर्थराज उके, आदेश गणवीर, जेसीआई गोंदिया सेंट्रल चे पुरुषोत्तम मोदी, अरुण बन्नाटे, दयारामजी, आदि अनेक सर्वसमाजातील विचारवंत मान्यवर सहभागी झाले होते. उपस्थित सर्वानी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून राष्ट्राची एकता व बंधुता प्रवर्धित करण्यासाठी संकल्प केला. तदनंतर युवा जागृती कार्यक्रमात अतुलनीय सहभागीते करिता तीर्थराज ऊके, दुलीचंद मेश्राम, दिलीप कोसरे, कु. साक्षी भेलावे, माधुरी कैलास भेलावे, यांचा स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.