Home विदर्भ ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर

ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर

0

गोंदिया,दि.4 : गोंदिया जिल्ह्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांकरीता पारंपारीक पध्दतीने राबविण्यात यावयाचा कार्यक्रम जाहिर झाला असून तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटिस प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 मे 2022. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक 13 मे 2022 ते 20 मे 2022, वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत (दि.14,15,16 मे 2022 सार्वजनिक सुट्टी वगळून). नामनिर्देशपत्र छाननी करण्याचा दिनांक 23 मे 2022, वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 मे 2022, वेळ दुपारी 3 वाजता पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 25 मे 2022, वेळ दुपारी 3 वाजता नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 5 जून 2022, वेळ सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (नक्षलग्रस्त भागांमध्ये सकाळी 7.30 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक 6 जून 2022. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2022 पर्यंत. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Exit mobile version