
विनोद सुरसावंत/ककोडी,दि.23ः- देवरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या ककोडी परिसरातील विविध समस्यांना घेऊन येथील कृषोन्नती शेतकरी प्रोड्युशर कंपनीच्या संचालक शिष्टमंडळाने मतदरासंघाचे खासदार अशोक नेते यांची भेट घेऊन चर्चा केली.भेटीदरम्यान ककोडी क्षेत्रातील शेतकर्यांच्या विविध समस्यावर सविस्तार चर्चा करण्यात आली.तसेच निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शेतकरी कृषी पंपानां लवकर विद्युत कनेक्शन जोळणी करुन देणे,कृषी कर्ज,रब्बी धान खरेदी करण्यात येणार्या अडचणी तसेच ककोडीला येथे नविन मोबाईल टाँवरची लवकर व्यवस्था करणे आदी मागण्यांचा समावेश होता.खासदार नेते यांनी सर्व विषयांवर लवकर कार्यवाही करूण शेतकर्यांची सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी शेतकरी प्रोडयुसर कंपनी संचालक मंडळाचे अध्यक्ष मनेंन्द्र मोहबंशी, मनोज मेश्राम( सचिव),चंदण हिरवाणी ( कोषाध्यक्ष), जोहारी कुंभरे(सहसचिव),दिलीप अमरवाडे (संचालक) व शेतकरी प्रोड्युसरचे सभासद उपस्थित होते.