सौंदड येथील सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलचे वर्चस्व

0
14

**राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी
सडक अर्जुनी:-– सौंदड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सौंदड र.न.५१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थित शेतकरी सहकार पॅनलने भाजपा समर्थित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा दणदणित पराभव केला.सर्व 13 सदस्य निवडून आणले. सदर निवडणुकीत पॅनलच्या विजया साठी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बबनलाल चू-हे व प्रभुदयाल लोहिया यांनी अथक परीश्रम घेतले. विजयी झालेल्या सदस्यांमध्ये दुधराम बावनकर राका ( ओबीसी ),सौ. सुरेखा निम्बेकर सौंदड़ (महिला राखीव) बलिराम वाघाडे राका (वी. मा. प्र.राखीव),भजनदास बडोले(अनुसूचित जाति राखीव),रामनाथ इरले सौंदड़,अशोक कापगते पलस गांव ,आत्माराम कापगते भदूटोला,किशोर गाहने फुटाळा,मोरेश्वर चांदेवार सौंदड,गोविंदा ब्रह्मानकर,विष्णु लन्जे सिंदीपर,प्रभुदयाल लोहिया सौंदड़,सौ. अश्मिता मेंढे सौंदड़.अशी विजयी सदस्यांची नावे असुन सर्वांचे उपस्थित सभासदांनी पुष्पहारानी अभिनंदन केले.