एफडीसीएमच्या कॅरीडोर परिसरात ५00 प्राण्यांची नोंद

0
32

गोंदिया- नवेगाव कॅरीडोरमध्ये येत असलेल्या एफडीसीएमच्या नियंत्रणाती जांभळी-१ व जांभळी-२ क्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला सेवा संस्थेच्या सहकायार्ने उपविभागाकडून प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान, सर्ववर्गीय ५00 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बिबट, अस्वल, निलगाय, चितळ, रानगवा, रानडुक्कर, मोर, रानमांजर आदी प्राण्यांचा समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणे बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षित तसेच संलग्नित क्षेत्रामध्ये प्राणीगणना करण्यात आली. सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील नागझिरा-नवेगावबांध कॅरीडोरमध्ये येत असलेल्या जांभळी-१ व जांभळी-२ या एफडीसीएमच्या वनपरिक्षेत्रामध्ये सेवा संस्थेचे स्वयंसेवी व वनकर्मचार्‍यांनी जवळपास १५ मचानाच्या माध्यमातून प्राणीगणना केली. दरम्यान या क्षेत्रामध्ये एकूण ५00 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बिबट-७, अस्वल-८, रानगवा-८0, रानकुत्रे-२५, चितळ/हरीण-४0, चौसिंगा-२, रानडुक्कर-७७, माकड-२00, निलगाय-४६, मोर-१३, रानमांजर-२ या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक खार व दोन साळू या पक्ष्यांचीही नोंद झाली आहे. प्राणी गणनेत सेवा संस्थेचे अध्यक्ष सावण बहेकार, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक नितीन सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदेश्‍वर, लांबट, सेवा संस्थेचे चेतन जसानी, अभिजित परिहार, शशांक लांडेकर, कन्हैय्या उदापुरे, पवन लटये, पवन सोयाम, नदिम खान, बंटी शर्मा, सिद्दी वडके आदि निसर्गप्रेमींचा समावेश होता.