आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळद्वारे सेवा संस्था सन्मानित

0
21

गोंदिया,दि.25ः- महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (MSBB) ने नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2022 साजरा करण्यात आला. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची थीम ‘सर्व प्राणीमात्रासाठी सामायिक भविष्य निर्माण करणे’ हे आहे.या कार्यक्रमात गोंदिया येथील सेवा संस्थेला उत्कृष्ठ कार्याकरीता सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर,महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील,मुख्य वनसरंक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव  प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.  महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळद्वारे जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे आवाहन कार्यक्रमात उपस्थितांना करण्यात आले.

सेवा संस्था गोंदिया जिल्ह्यात सोबतच लगतच्या भंडारा व मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कार्य मागील १ दशकापासून करत आहे. सेवा संस्थेच्या जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धनाच्या कार्याची दखल घेत जैवविविधतेच्या संवर्धनाची कामगिरी उत्कृष्टपणे केल्यामुळे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळद्वारे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2022 च्या कार्यक्रमात स्मुर्ती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सेवा संस्थेला सन्मानित करण्यात आले. आणि मुख्यत सेवा संस्थेच्या सारस पक्षी संरक्षण व संवर्धनाच्या कार्याची मंचावरून प्रशंसा करण्यात आली.सेवा संस्थेकडून सन्मान स्विकारायला संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, चेतन जसानी, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे उपस्थित होते.