शिक्षक संघातर्फे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सदस्यांचा सत्कार

0
31

आमगाव-_महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा आमगाव च्या वतिने पं.स.आमगावचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सदस्य यांचा सत्कार सोहळा नुकताच पं.स.च्या सभागृहात पार पडला. सभापती राजेंद्र गौतम, उपसभापती नोहरलाल चौधरी, पं.स सदस्य सुनंदा उके, तिलकचंद मडावी, तारेंद्र रामटेके यांचे संघटनेच्या वतिने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुरेश रहांगडाले यांनी तालूक्यातिल शिक्षकांच्या विविध समश्या पदाधिकाऱ्यां समोर मांडल्या तसेच ओमेश्वरी बिसेन यांनी महिला शिक्षकांच्या समश्या मांडल्या. त्याचबरोबर डी. टी. लाडे व एम. सी. मेळे यांनी आपापल्या क्षेत्राशी संबंधित समश्या मांडल्या. यावर सभापती उपसभापती व सदस्य यांनी येणाऱ्या काळात शिक्षकांशी समन्वय साधूनच शालेय कामे केली जातील. शिक्षकच आमचे आदर्श आहात.आमचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळेतच पुर्ण झाले असल्यामुळे आम्हाला जि.प.शाळेबद्दल आपुलकी व प्राथमिक शिक्षकांच्यासमस्यांची जान आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या शिक्षक बांधवांना होऊ देणार नाही, कोणतीही कामे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच केली जातील असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन सचिव मयूर राठोड यांनी तर आभार सहसचिव के.जी.रहांगडाले यांनी मानले.सत्कार प्रसंगी सुरेश रहांगडाले , एन.एस.कोरे , आनंद मेश्राम, ओ. इस. बिसेन, जी.टी.रहांगडाले , किशोर रहमतकर, गुलाब भुसारी , एम.सी.मेळे, डी.टी.लाळे,रमेश भलावी, ओमेश्वरीताई बिसेन , मंदाताई कावळे , वर्षा राऊत , रेणुका तुमसरे, एस.एम.येडे, एस.पी.पारधी, एच.एल.मानकर ,रमण हुमे, एस. के. पाथोडे, आर.एन.करंडे,लक्षणे सर, आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.