पक्षसंघटन हेच निवडणुकीतील यशाचे गमक आहे- आमदार कोरोटे

0
44

■ देवरी येथे तालुका काँग्रेसर्फे सभेचे आयोजन.

देवरी,दि.२६ : काँग्रेस सरकारने या देशात रोड- रस्ते, रेल्वे, शाळा महिविद्यालये, धरणे, रुग्णालय आदींसह मोबाईल आणि संगणक क्रांती घडवूऩ आणली. परंतु, मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारने या देशात दिवसं-दिवसे इंधनाचे व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढवून सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवन जगणे कठीण केले. या देशात दररोज महागाई वाढवून येथील लोकांना लुबाडण्याचेण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य हमी भाव नाही. याविरोधाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनजागृती करून लोकांच्या अडीअडचणी व समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. लोकांना कॉंग्रेसच्या विचार सरणीशी जोडून पक्ष संगठन बळकट करण्याचे काम करावे. पक्षसंगठने शिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आ. कोरोटे हे देवरी येथील सीताराम मंगल कार्यालयात आयोजीत देवरी तालुका काँग्रेस कमेटीच्या सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, जि.प.सदस्य राधिकाबाई धरमगुळे, पं.स.सदस्य रंजित कासम, प्रल्हाद सलामे, अनुसयाबाई सलामे, भारती सलामे, नगरसेविका, सुनिता शाहू, नगरसेवक सरबजीत सिंग भाटिया(शैन्की), नितीन मेश्राम, माजी सभापती सुनंदा बहेकार, माजी पं.स.सदस्य उत्तम मरकाम, विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष दिपक (राजा) कोरोटे,बळीराम कोटवार, कुलदिप गुप्ता यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य पक्षाचे वरिष्ठ पदाधिकरी उपस्थित होते.
यावेळी श्री कोरोटे पुढे म्हणाले की, आपला तालुका हा काँग्रेस पक्षाचा गड आहे. परंतु, मागच्या काळात आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष करून येथील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते. परंतु, आता मी आपल्या पक्षाचा आमदार आहे. तरी या विषयी कोणतेही मतभेद असतील ते बाजूला सारून स्वत:ला पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता समजून काम करावे. आता काँग्रेस पक्षाचे मंडळ व ग्रामकाँग्रेस कमेटी तयार होणार आहे. ग्रामकमेटी कडून जे ही विकासात्मक कामाचे प्रस्ताव येतील फक्त त्या प्रस्तावावरच विचार केले जाईल. या माध्यमातून आपण या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यास कधीच कमी पडणार नाही, असेही म्हटले.
या सभेत ओवाराचे राजुभाऊ उईके, खुडसुंगटोलाचे देवेन्द्र मडावी, श्री. डोये आणि देरीचे आकीब बेग यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी फुटाणाचे सरपंच कमलेश नंदेश्वर, रंजित कासम, सुनंदाताई बहेकार यांनी ही मार्गदर्शन केले.
सभेचे प्रास्ताविक संदीप भाटिया यांनी तर संचालन माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके यांनी केले. उपस्थितांचे आभार युवक काँग्रेस विधानसभेचे माजी अध्यक्ष अविनाश टेंभरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.