
गोरेगांव,दि.30- तालुक्यातील मोहाडी येथील आदर्श सार्वजनिक वाचनालय तालुका अ दर्जा ग्रंथालय येथे २९ मे २०२२ ला जिल्हा ग्रंथालय संघ व ग्रंथालय अधिकारी कार्यालय मार्फत सार्वजनिक ग्रंथालया करिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंदिया जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र शिवकुमार शर्मा होते. तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे,जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डि.डी.रांहागडाले, ग्रंथालय संघाचे सहसचिव ग्रंथमित्र वाय.डि.चौरागडे, ग्रंथालय संघाचे सदस्य वाय.एस.भगत,एफ.आर.बिसेन आदी उपास्थित होते. ग्रंथालय विषयी विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करून होणारे विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले.या कार्यशाळेला गोरेगाव तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.हिरालाल महाजन,जे.जे.पटले, दुर्गेश चचाने, सुभाष चौरागडे, परमानंद तिरेले,संजय पारधी,बिसराम बहेकार, चंन्द्रकुमार चौरागडे आदीनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक संस्थेचे सचिव ग्रंथमित्र वाय.डि.चौरागडे यांनी तर संचालन एल.पी.रांहागडाले यानी केले तर आभार नरेंद्रकुमार चौरागडे यांनी मानले.