सिव्हील लाईन येथे सर्पमित्राने दिले घोरपडीला जीवदान

0
32

अर्जुनी-मोरगाव : शहरातील सिव्हील लाईन परिसरात घरात शिरलेल्या घोरपडीला पकडून जीवदान देण्याची घटना घडली. निलेश चिंतनवार असे घर मालकाचे नाव आहे.

एरव्ही जंगलात राहणारी घोरपड शहरातील सिव्हिल लाईन परिसरात निलेश चिंतनवार यांच्या घरामध्ये अचानक शिरली. सदर माहिती सर्पमित्र राहुल लाडे यांना देण्यात आली.लाडे यांनी लगेच घटनास्थळ गाठले. अत्यंत चपळ असलेल्या घोरपडला मोठ्या शिताफीने त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. घोरपडीला तालुक्यातील सोनेगाव जंगल परिसरात सोडून जीवदान देण्यात आले. यावेळी प्रेमदास मेश्राम,राधे प्रधान उपस्थित होते.जंगलात राहणारे घोरपड दाट लोकवस्तीमध्ये आली कुठून याचे नवल व्यक्त केले जात आहे.