गोंदिया,दि.३१ में २०२२ः– येथील बाहेकर व्यसन मुक्ति केंद्र गोंदिया , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया आणि रिलायंस कैंसर हॉस्पिटल गोंदियाच्या सयुक्त विद्यमानाने गंगाबाई रुग्णालय येथे जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.घोरपडे होते.प्रमुख अतिथि म्हणुन वैद्यकीय अधिक्षक डॉ.जायसवाल , डॉ.आटे, डॉ,पावळे,डॉ.सुवर्णा हुबेकर,डॉ.सौरभ मेश्राम ,डॉ.सुलभ रहांगडाले , डॉ.नागेश शेवारे उपस्थित होते.
यावेळी डॉ.घोरपडे यानी आपल्या संबोधनात विद्यार्थी आणि लोकांना सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस ‘तंबाखू सेवन विरोधी दिन’ जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून घोषित केला असला तरी, तंबाखू, गुटखा आणि सिगरेट यांचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण ‘जसेच्या तसेच आहे. तसेच व्यसनमुक्ती साठी गुटखा आणि सुट्या सिगरेटच्या विक्रीवर बंदी असूनही बाजारात सर्रास याची विक्री होतांना दिसून येते. नागरिकांना मौखिक आरोग्य तपासणी करून कॅन्सरसारख्या घातक रोगांपासून लांब राहण्यासाठी तंबाखू व गुटखा आदी व्यसना पासुन दूर रहावे असे सांगितले.
डॉ. सौरभ मेश्राम यानी जगामध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये निम्म्या पेक्षा जास्त कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने होतात.तंबाखू सेवनाने फ्फुफुस, अन्न नलिका, किडनी, आतड्या, यकृत सारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग उद्भवतात. या पदार्थांचे धोके लक्षात घेऊन सर्वंनीच त्यापासून दूर राहण्याचे सल्ले डॉक्टर देतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. डॉ.सुवर्णा हुबेकर यानीही 54% युवा पिढी ही तंबाखू – गुटखाचे व्यसनाधीन झाल्याने मोठा धोका निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली. तंबाखू हेच मौखिक कर्करोगाचे प्रमुख कारण असल्याने मौखिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी तंबाखू खाऊच नये, मौखिक कर्करोग जर पहिल्या अवस्थेत निदान झाला तर तो आटोक्यात आणता येतो. म्हणूनच नागरिकांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी असे त्यानी सर्वाना सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व् नागरिकाना व्यसनमुक्त होण्यासाठी संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी मित्रानी कलापथक तसेच विविध कलाकृतिचे चित्र लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता बाहेकर व्यसनमुक्ति केंद्राचे प्रकल्प समन्वयक मनीष मुनेश्वर , ज्योति कोटागले समाज सेविका , राकेश हत्तीमारे रिलायंस कैंसर हॉस्पिटल गोंदियाआदी उपस्थित होते.