कोविंड लसीकरणाला “बूस्टर” जिल्ह्याचे नियोजन

0
30

हर र दस्तक मोहीम– 2 कालावधी दिनांक 1 जून 2022 ते 31 जुलै 2022.
दि.16 जानेवारी 2021 पासून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिम जिल्हाधिकारी मा. नयना गुंडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत नियोजन बद्ध सुरू आहे.
जिल्ह्याची सद्यस्थितीत कोविड लसीकरण स्थिती पुढील प्रमाणे

वयोगट उद्दिष्ट पहिला डोज टक्केवारी पहिला डोज टक्केवारी प्रिकॉशन डोज टक्केवारी
12 ते 14 वर्ष 44162 33323 75.46 14658 33.19
15 ते 17 वर्ष 68321 50242 73.54 35943 52.61
18 वर्ष वर 1030400 987153 65.80 804219 78.05 17011 1.65
एकुण 1142883 1070718 93.69 854820 74.80 17011 1.49

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविंड रुग्णांची पॉझिटिव्हिटी नियंत्रणात आहे. तसेच कोविंड वर्तुणक बदलाचे नियमावर सूट असल्याने काही दिवसांमध्ये सण,पर्यटन स्थळा वरील गर्दी ,छुप्या पार्टी, लग्न समारंभासह राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रवासासाठी रेल्वे स्टेशन ,बस स्टँड,खाजगी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा गर्दी, हॉटेल रेस्टॉरंट मध्ये पार्टी व जेवण्यासाठी गर्दी होत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर करणे कमी झालेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ,रेल्वे स्टेशन ,बस स्टँड, बाजार, रस्ते व इतरत्र जिकडे-तिकडे लोकांची गर्दी पहावयास मिळत आहे. त्यातच अजूनही सहा टक्के लोकांनी कोविंड लसीकरणाचा पहिला डोस सुद्धा घेतलेला नाही. अजूनही 25 टक्के लोकांनी कोविंड लसीकरणाचा दुसरा डोस न घेतल्याचे चित्र दिसत आहे. तसेच प्रिकॉशन डोज फक्त 1.49 टक्के लोकांनी घेतलेला आहे.
जिल्ह्यात कोविंड परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी ती केव्हाही वाढू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण कोविंड वर्तणूक बदलाच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे व कोविंड लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन सुरक्षित झाल्याचे प्रमाण 75 टक्के आहे. म्हणजेच 25 टक्के लोकांमुळे कोविंड परिस्थिती केव्हाही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते. यावर सर्व जनतेने गंभीर राहिले पाहिजे. कोविंड लसीकरण हे कोविंड परिस्थिती नियंत्रणात राखण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झालेले असून सुद्धा लोक कोविंड लसीकरण घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
कोविंड लसीकरण सर्वांना होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात हरघर दस्तक मोहिमेचा पहिला टप्पा दिनांक 3 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत राबविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका,आशा सेविका व इतर विभागांच्या मदतीने मोलाची कामगिरी करून रस्त्यावर,शेतात, वीट भट्टी वर, रोजगार हमी कामावर तसेच आजारी, अपंग, अंथरुणावर खिळून असलेल्या लोकांना घरोघरी जाऊन लसीकरण करून मोहीम यशस्वी केली होती. स्वतः जिल्हाधिकारी मा. नयना गुंडे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अनिल पाटील, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. दिनेश सुतार व त्यांच्या सोबतीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी गावोगावी घरी जाऊन लसीकरणा संबंधित जनजागृती करून लोकांचे मत परिवर्तन केले होते.
त्याच अनुषंगाने दिनांक जून 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत र घर दस्तक टप्पा दुसऱ्या मोहिमेचे आयोजन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियोजनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्षात गावोगावी लसीकरण मोबाईल टीमच्या माध्यमातून केले जाणार असुन सोबत इतर विभागानी सह्कार्य करुन बुस्टर मोहिमेला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत शाळा जरी बंद असले तरि हरघर दस्तक मोहिमे दरम्यान शाळेय मुलांचे विहित अंतरातील दोन्ही लसिकरण डोज पूर्ण करावी तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर व साठ वर्षे वा त्यावरील सह व्याधी असलेले नागरिक यांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावे. संबंधित लाभार्थ्याने दुसऱ्या डोसच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावे. आरोग्य विभागा सोबत सर्व विभाग जसे शिक्षण, महिला व बाल विकास ,ग्राम पंचायत,नगर परिषद ,पोलिस ह्या सर्वानी सहयोग देवुन मोहिम यशस्वी करावी.
        -डॉ. नितीन वानखेडे , जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया
मोहिमेचे उद्दिष्ट –

  1. कार्यक्षेत्रातील सुटलेल्या व अपुर्ण लसीकरण झालेल्या सर्व पात्र लाभार्थाचा ग्रुह भेटीद्वारे शोध घेवुन कोविंड लसीकरण पुर्ण करुन घेणे व कार्यक्षेत्रातील 100 टकके लसीकरण होइल या द्रुस्टीकोनातुन नियोजन करणे.
  2. कार्यक्षेत्रातील शाळेय मुलांचे विहित अंतरातील दोन्ही लसिकरण डोज पूर्ण करणे.
  3. कार्यक्षेत्रातील हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर व साठ वर्षेवरील असलेले नागरिक याचे प्रिकॉशनरी डोस पूर्ण करणे.

लसिकरणाचे फायदे

  • शरीरात प्रतिकारशक्ती वाढते विषाणूशी लढणाऱ्या ची क्षमता निर्माण होते.
  • आजाराशी लढण्यासाठी तुमच्यात आधीची प्रतिकारशक्ती वाढेल लसीचा अर्थ खरोखर आपल्या आत वाढणाऱ्या विषाणू रोखण्यास मदत करणे आहे.
  • लसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर ती बुस्टर सारखी कार्य करेल जेणेकरून विषाणू शरीरात पसरू नये.
  • जर तुम्हाला लस मिळाली तर सर्वात मोठा फायदा म्हणजे शक्यतो रूग्णालयात भर्ती होणे टाळणे तुम्हाला संसर्ग झाला असला तरी तुम्ही घरी आयसोलेशन मध्ये राहूनच बरे व्हाल या आजारापासून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.
  • गर्भवती स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विरुद्ध लढाईची क्षमता कमी असते त्यामुळे गर्भवती महिलांना कोरोना काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे लस घेतल्यानंतर इतरांना जसे छोटे-मोठे परिणाम जाणवतात तसेच गरोदर मातानाही जाणू शकतात त्यामुळे न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

   ‌- डॉ. दिनेश सुतार , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी