मुख्याध्यापक एच.एस.बिसेन यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
41

गोरेगांव,दि.३१ ःः तालुक्यातील जि. प. केंद्रिय वरीष्ठ प्राथ. शाळा मुंडीपार येथील मुख्याध्यापक एच.एस.बिसेन हे वयोमानानुसार आज नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सुमेंद्र धमगाये होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच जावेद (राजाभाई खान),  अध्यक्ष शा. व्य. समितीचे शामकुमार डाहाके,उपाध्यक्ष रेखाबाई शहारे,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,नामदेव नेवारे, सेवानिवृत्त ऊच्चश्रेणी मुख्याध्यापक बी.जी.कटरे,पंढरी कटरे,केंद्रप्रमुख एच.एस.शहारे,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,मुख्याध्यापक बी.ए.रहांगडाले व शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.
या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार मूर्तीचे शाल व श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यांत आला. व सत्कारमूर्तीच्या कार्यावर व जीवनावर प्रकाश टाकून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे संचालन व्ही.एम.गायधने यांनी केले तर एस.एम. काठेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.