जिपचे सात, पंचायत समितीचे १४ सर्कल वाढले

0
72

जिप, पंचायत समितीची प्रभाग रचना जाहीर

अमरावती, दि. 4: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे . आज गूरूवारी प्रभाग रचनेची अधिसुचना जाहीर करण्यात आली. सात तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे सात व पंचायत समितीचे १४ सर्कल वाढले आहेत.

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजीच संपुष्टात आला आहे. याठिकाणी प्रशासकाची नियूक्ती करण्यात आली.
दरम्यान गत एक वर्षांपासुनच प्रभाग रचना आणि आरक्षणावर विविध चर्चेला उधान आले होते. आज निवडणुक विभागाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत गूरूवारी २ जुन रोजी प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये भातकुली, चांदूरबाजार, अचलपुर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापुर आणि वरूड या सात तालुक्यात सात गट आणि १४ गण नव्याने निर्माण करण्यात आले आहेत.त्यामुळे आता जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ६६ तर पंचायत समितीची सदस्य संख्या १३४ होणार आहे.तसेच पुनर्रनेत सात तालुक्यांमध्ये सर्कलच्या नावात देखील बदल करण्यात आला तर नव्या नावाचे सर्कल निर्माण करण्यात आले आहे.त्यामुळे आता मतदारांमध्ये आपण कोणत्या सर्कलमध्ये आहोत हे पाण्याची उत्सुकता लागली आहे.

८ जुन पर्यंत आक्षेप व हरकती
जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणुक विभागात कार्यालयीन वेळेत ८ जुन पर्यंत आक्षेप व हरकती स्विकारल्या जाणार आहे.त्यामुळे नागरीकांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवडणुक विभागातील प्रमोद देशमुख यांनी केले आहे.२२ जुन रोजी प्राप्त हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेवुन अंतिम करतील, त्यानंतर २७ जुन रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द केली जाणार आहे.

वाढलेले सर्कल

चांदूरबाजार: सोनोरी, वरूड: राजुराबाजार, शहापुर, आमनेर,अचलपुर: गौरखेडा , धारणी: कुटंगा, गोडसावंगी, घुटी, सावलीखेडा, हलिसाल, राणीगाव, अंजनगाव सुर्जी: ,खानापुर पांढरी, विहिंगाव बु, ,भंडारज, दर्यापूर: थिलोरी, माहूली धांडे, शिंगणापुर, खल्लार, गायवाडी, भातकुली: वाठोडा शुक्लेश्वर, निंभा, पुर्णानगर, साऊर, आसरा.