महिला वनरक्षकांना जखमी करणार्‍या अतिक्रमणधारकांवर कारवाई करा

0
23

आष्टी-मार्कंडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या गुंडापल्ली नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १५१६ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा (कं) याचे आदेशानुसार २८ मे रोजी सकाळी अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहूलसिंह तोहलिया, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी बुधनवार, मार्कंडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांच्या नेतृत्वात मुलचेराचे सहायक पोलिस निरीक्षक भापकरव त्यांच्या चमू, नायब तहसीललदार तलांडे यांच्या नेतृत्वात वनरक्षक, वनपाल पुरूष महिला अतिक्रमण निर्मुलनाचे कामे करण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी त्यांच्यावर हल्ला करून महिला वनरक्षकांना जमखी करणार्‍या अतिक्रमणधारकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वनपालक, वनरक्षक संघटनेने पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गुंडापल्ली येथील कक्ष क्रमांक १५१६ मध्ये विजय नगर गावातील काही नागरिक अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण काढण्यासाठी २८ मे रोजी वनविभागाचे अधिकारी, वनपाल, वनरक्षक गेले असता गावातील महिलाव पुरुष घटनास्थळी जमा होऊन अतिक्रमण काम रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचार्‍यांना त्यांना मल्लाव करीत होत्या. हा विरोध झुगारून विजयनगर येथील सुचित्रा संजय मंडल व इतर ९ महिलांनी शारिरिक सार्मथ्याचा बलप्रयोग करून महिला कर्मचार्‍यांच्या हातातील लाठी खिचून महिला कर्मचारी भवानी चंद्रय्या निलम, रसिका सत्यावान मडावी, किशोरी आनंद नन्नावरे यांना जमिनीवर पाडून शरीराचा भागाला व शासकीय वर्दीला ओढताण करून जबर मारहाण केले. त्यामुळे महिला कर्मचार्‍यांना दुखापत झाली. सदर महिला एफआयआर नुसान गुन्हा नोंद केला असून वरील आरोपींना आजतागायात अटक करण्यात आली नाही, ही खेदाची बाब आहे. सदर आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित पोलिस अधिकार्‍यांना निर्देश देवून जखमी महिला कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अन्यथा संघटना याचे विरोधा धरणे आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना वृत्त अध्यक्ष गडचिरोली नितेश कुमरे, केंद्रीय सदस्य (म.रा) बाळू मडावी, वृत्तीय उपाध्यक्ष हरीश दहागावकर, विभागीय अध्यक्ष आलापल्ली श्रीनिवास धानोरकर, कार्याध्यक्ष देवानंद कचलामी आदी उपस्थित होते.