
शेतकरी धानावरील डीबीटी बोनसच्या प्रतीक्षेत..
✍️विपुल परिहार/मोहाडी,दि.06ः भंडारा जिल्ह्यांत जास्तीत जास्त शेतकरी भातपिकावर अवलंबून आहेत,परंतु वाढलेल्या खतांच्या किंमती व महागाईमुळे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांची मोठया प्रमाणावर घोषणा करण्यात येते. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. शेतकाऱ्यांबद्दल शासन एवढे उदासीन का?असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे शेतकऱ्याकडे आठरावर्षं दारिद्र्य असून सुद्धा शेतीवर खर्च करण्यात मागे पुढे पाहत नाही. कारण त्याला मुलांचे शिक्षण, व कौटुंबिक उदरनिर्वाह शेतीतून आलेल्या उत्पादनावरच चालवायचा असतो. मागील दोन वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे. धान उत्पादक शेतकऱ्याची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. त्याला जेवढा निसर्गाचा लहरीपणा जबाबदार आहे तर तेवढेच शासनही जबाबदार आहे असे म्हणण्यास हरकत नाही. मागील दोन वर्षे शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये प्रति क्विंटल बोनस दिला. त्याबद्दल सर्व स्तरावरून या निर्णयाचा स्वागत करण्यात आले या वर्षी सुद्धा आपल्याला बोनस मिळेल या आशेने बऱ्याच शेतकर्यांनी आपले धान आधारभूत खरेदी केंद्रावर विकले. त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते करण्यात आले. परंतु आपण दिलेल्या धानाला या वर्षी सुद्धा बोनस मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आपल्या शब्दात सांगितले,की दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण शेतकऱ्यांना बोनस मिळणार पण या वर्षी डीबीटी मार्फत शेतकऱ्यांना बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. बराच काळ उलटला असून अजूनही डी.बी.टी.बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शासनाने बोललेले शब्द पूर्ण करावे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचे महाविकासआघाडी तील राज्य सरकारने आपल्या घोषणा पत्रा म्हंटले होते. तर आपल्या शब्दावर कायम राहून महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात यावे.खरीप हंगाम तोंडावर असताना येणाऱ्या डीबीटी बोनसच्या पैशाने खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते विकत घेता येईल या आशेवर शेतकरी आहे परंतु त्यावर विर्जन पडते की काय अशी भीती शेतकर्यांना वाटत आहे येणाऱ्या हंगामासाठी शेती करायला पैसे आणायचे कुठून की पुन्हा खाजगी सावकाराच्या दारात जावे लागेल अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे म्हणून शासनाने तात्काळ डीबीटी बोनस ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करावी अशी मागणी शेतकरी नेते तथा ग्रामपंचायत सदस्य काटेबाम्हणी नरेश टेंभरे यांनी केली आहे.