
अर्जुनी/मोर.- शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोर. येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जयंती व पुण्यतिथी उत्सव समितीच्या वतीने 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा ईश्वर मोहुर्ले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शरद मेश्राम डॉ. गोपाल पालीवाल डॉ. मोतीलाल दर्वे उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून विद्यार्थी व मान्यवरांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला सिद्ध करणारे गीत बादल गणवीर या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केला. अजित ठलाल यांनी महाराजांच्या राज्याभिषेकावर आधारित पोवाडा प्रस्तुत केला. प्रमुख अतिथी डॉ. शरद मेश्राम तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा मोहूर्ले यांनी महाराजांच्या कार्याची माहिती दिली, शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले. डॉ. मोतीलाल दर्वे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शिवराज्याभिषेक दिनाची पार्श्वभूमी विशद केली. इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाची व्हिडिओ क्लिपही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अजित ठलाल या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. आर. दर्वे,प्रा. अजय राऊत, डॉ.शरद मेश्राम यांनी परिश्रम घेतले.